Thursday, November 2, 2017

रवा बेसन लाडू / Rava Besan Ladoo

रवा बेसन लाडू /  Rava Besan Ladoo

This is an Indian sweet, usually prepared during Diwali in Maharashtra. Its a bit crispy because of the rava(Semolina) in it and yet binds together bcoz of the besan (gram flour). 



साहित्य

  • बारीक रवा
  • बेसन
  • तूप
  • साखर
  • वेलचीपूड
  • मनुका 
  • क्रश केलेले काजू बदाम 

कृती

  1. बारीक रवा मध्यम आचेवर थोडं तूप घालून भाजावा. ब्राऊन रंग येईपर्यंत भाजणे. तसेच भाजताना सतत पलित्याने ढवळत राहणे . (मोठ्या आचेवर भाजल्यास रंग पटकन येईल पण रवा कच्चाच राहिल.) रवा भाजला कि परातीत काढून ठेवावा.


  2. त्याच कढईत थोडे तूप घालून, मध्यम आचेवर बेसन खमंग भाजून घ्यावे.





  3. साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेणे.
  4. मनुका तुपामध्ये तळून घेणे
  5. परादीमध्ये भाजलेला रवा आणि भाजलेले बेसन मिक्स करणे त्यात आवश्यकतेएवढी बारीक केलेली साखर घालणे. वेलचीपूड, क्रश केलेले काजू बदाम आणि मनुका  घालणे. गॅसवर कढई ठेऊन त्यात थोडे तूप वितळेपर्यंत गरम करून ते त्या मिश्रणात घालणे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणे. आणि त्यानंतर लाडू वळावेत.

टीप 

  • रवा आणि बेसन भाजताना मध्यम आचेवरच भाजणे.
  • लाडू वळतानाचा मिक्स पिठामध्ये तूप टाकणे.
  • लाडू वळता येतील एवढंच तूप गरम करून त्यामध्ये टाकणे.
  • हे लाडू फ्रीज मध्ये ठेऊ नयेत.
  • हवाबंद डब्यात भरून बाहेरच ठेवणे.





Thursday, October 5, 2017

मालवणी भेंडीचं सार / भेंडीचं चविष्ट कालवण / Okra Curry

मालवणी भेंडीचं सार / भेंडीचं चविष्ट कालवण / Okra Curry




साहित्य 
  • ५-६ भेंडी 
  • १ चिरलेला टोमॅटो 
  • १ चिरलेला कांदा
  • १ वाटी किसलेलं ओलं खोबरं 
  • ५-६ लसणीच्या पाकळ्या 
  • २-३ कढीपत्त्याची पाने 
  • अर्धा चमचा मोहरी 
  • ४-५  सुक्या लाल मिरच्या 
  • पाव चमचा हळद 
  • २-३ कोकम
  • चवीपुरते मीठ 


कृती 

  • ४-५ सुक्या लाल मिरच्या १ तास पाण्यात भिजत ठेवणे.

  • किसलेलं ओलं खोबरं, भिजत ठेवलेल्या सुक्या मिरच्या, त्यात जराशी हळद टाकणे, ३-४ लसणीच्या पाकळ्या टाकणे, चिरलेला कांदा आणि चिरलेला टोमॅटो हे मिश्रण मिक्सर मध्ये बारीक वाटून घेणे.
  • भेंडी स्वच्छ धुऊन चिरून घेणे.
  • गॅस वर टोप ठेऊन थोडणीकरता त्यात थोडं तेल टाकणे. नंतर त्यात मोहरी टाकणे. मोहरी गरम झाली कि त्यात लसणीच्या ३-४ लसणीच्या पाकळ्या टाकणे आणि कढीपत्ता टाकणे. आणि नंतर त्यात चिरलेली भेंडी टाकून चमच्याने मिक्स करणे. भेंडी थोडी गरम झाली कि मग त्यात थोडं पाणी घालून चवीपुरतं मीठ टाकणे. 
  • भेंडी शिजत आली कि मग त्यात मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतलेले वाटण घालणे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालणे. 
  • २-३ कोकम टाकणे आणि नंतर त्यात चवीपुरते मीठ घालणे.
  • भेंडीच्या आमटीला उकळी आली कि मग गॅस बंद करणे.
  • सर्व्ह करा.
टीप 
  • कोकमाऐवजी आमसूल सुद्धा घालू शकता.
  • भातासोबत हे भेंडीचं सार खूप छान लागत.






Monday, September 11, 2017

तांदळाची भाकरी / Rice Flour Roti



तांदळाची भाकरी / Rice Flour Roti 


तांदळाची भाकरी ही मालवणातील प्रसिध्द डीश आहे. ही भाकरी ओल्या नारळाची चटणी, चिकन, मटण, कुळदाच्या पिठल्या सोबत खूप छान लागते.

साहित्य
  •  तांदळाचे सुकं पिठ
  •  पाणी


कृती
  1. परादित किंवा ताटामध्ये तांदळाचे थोडे सुकं पिठ घेऊन त्यात थोडे पाणी घालून ते पिठ चांगले मळून घ्यावे


     
  2. परादित किंवा ताटामध्ये थोडे सुकं पिठ पसरवणे.
  3. तांदळाच्या पिठाचा मध्यम आकाराचा गोळा बनवणे.

  4. परदित पसरलेल्या तांदळाच्या सुक्या पिठावर गोळा ठेवणे.


  5. आणि त्या पिठाच्या गोळ्यावर तांदळाचं सुक पिठ थोडा पसरवणे. (त्यामुळे भाकरी थापताना ती हाताला चिकटणार नाही )
  6. त्यानंतर भाकरी हलक्या हाताने हळुहळु थापणे. भाकरी पूर्ण थापून झाली की मग गॅसवर खोलगट लोखंडी तवा ठेऊन तो चांगला तापला की मग त्यावर थापलेली भाकरी तव्यावर टाकणे.

  7. वरच्या बाजूने भाकरीला थोडंसं पाणी लावणे. ते पाणी सुकत आले की मग भाकरी पलीत्याणें परतवणे.

  8. भाकरीच्या पूर्ण कडा शेकून घ्या. त्यानंतर ती भाकरी पलटी करा आणि गॅस फास्ट करा.

  9. भाकरी फुगली की ती प्लेट मध्ये काढा आणि सर्व्ह करा.



टिप
  • तांदळाच्या भाकरीचे पिठ मळताना त्यात गरम पाणी सुद्धा घालू शकता किंवा पिठ भागउन घेतले तरी चालतं. त्यामुळे भाकऱ्या सॉफ्ट होतात.
  • भाकरी हाताने थापायला जमत नसल्यास तुम्ही पोळपाटावर चपात्यानं प्रमाणे लाटू शकता.
  • पिठ मळताना त्यात शिजलेला भात आणि थोडे मिठ टाकल्याने भाकरीला छान चव येते.

Saturday, August 26, 2017

मालवणी बेसनचा पोळा

मालवणी बेसनचा पोळा / Malvani Besan Poli 



साहित्य

  • बेसन
  • लाल तिखट
  • बारीक चिरलेला कांदा
  • बारीक चिरलेली कोथींबीर
  • हळद
  • तेल
  • चवीपुरते मीठ


कृती

  • प्रथम थोडे बेसन घेणे त्यात लाल तिखट, हळद, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथींबीर आणि चवीपुरते मीठ घालने 
  • आणि नंतर त्यात थोडे पाणी घालून ते मिश्रण मिक्स करणे. हे मिश्रण जास्त घट्टा किवा जास्त पातळ नकोय.


  • नंतर गॅस वर पसरट तवा ठेऊन त्यात थोडे तेल घालने नंतर त्यात मिश्रण टाकून पसरवणे आणि गॅस थोडा मोठा करणे. 
  • २-३ मिनिटांनी पलीत्याने पोळा परतणे. नंतर ५ मिनिटांनी गॅस बंद करणे.


टीप

  • हा पोळा गरम गरम खायला चांगला लागतो.
  • चपाती आणि भाकरीसोबत हा पोळा खूप छान लागतो.




Sunday, August 13, 2017

मालवणी आंबोळ्या (Malvani Aambolya)

मालवणी आंबोळ्या (Malvani Aambolya)


आंबोळी हि मालवणातील खास पाककृती आहे. काही लोक घावणे आणि आंबोली एकच समजतात पण तस नाही आहे. आमच्या मालवणात तरी घावणे आणि आंबोळ्या हे दोन वेगवेगळे पदार्थ आहेत. घावणे हे फक्त तांदळाच्या पिठाचे बनवले जातात . आणि आंबोळ्या ह्या पीठ आंबवून केले जातात . आंबोळी हि डोशाप्रमाणे पातळ व क्रिस्पी नसते तर जाडसर आणि मऊ असते. आणि आंबोळीला छान जाळी पडते.


साहित्य
  • ४ वाटी  जाडा तांदूळ
  • १ वाटी  उडीद डाळ
  • अर्धी वाटी चना डा
  • तेल
  • मीठ

कृती



  • प्रथम ४ वाटी जाडा तांदूळ, १ वाटी उडदाची डाळ आणि अर्धा वाटी चना डाळ स्वच्छ धुऊन ७ - ८ तास भिजत ठेवणे.
  • त्यानंतर ते मिक्सरला बारीक लाऊन घेणे. त्यात चवीपुरते मीठ टाकून परत ७-८ तास ठेऊन देणे.
  • त्यानंतर भिड्याला तेल पसरून लावणे नंतर त्यात मिक्स पिठ थोड घालून ते जाडसर पसरवणे आणि झाकण ठेवणे. 


  • आणि गॅस मंद ठेवणे. आंबोळीला छोटे - छोटे होल आल्यावर ती पलित्याने परतने आणि परत झाकण ठेवणे.


  • ५ मिनिटांनी गॅस बंद करणे.

टीप
  • हि आंबोली मटण रस्सा, कोंबडी रस्सा, काळे वाटाणे आमटी किंवा चना आमटी सोबत छान लागते .
  • नारळाच्या चटणीसोबत सुद्धा छान लागते. 
  • आंबोळ्या तुम्ही non stick pan मध्ये सुद्धा करू शकतात.


शेवग्याच्या पानाची भाजी / शेगलाची भाजी


शेवग्याच्या पानाची भाजी / शेगलाची भाजी





शेवग्याच्या शेंगांबद्दल सर्वांनाच माहिती आहे. यामध्ये व्हिटामिन ए, बी-१, सी, कॅल्शियम व लोह याचा साठा असतो. पण शेवग्याच्या पानांमध्येही व्हिटामिन ए, बी-१, सी, फॉस्फरस, काबरेहायड्रेट, लोह व प्राथिने यांचा भरपूर साठा असतो व याची भाजी पण चवदार होते. कोकणात गोकुळाष्टमीच्या उपवासाला हि भाजी आणि आंबोळ्या करतात.

साहित्य :
  • शेवग्याचा पाला
  •  २ मोठे कांदे
  • हिरव्या मिरच्या
  • किसलेलं ओलं खोबरं
  • नारियल तेल
  • चवीपुरते मीठ
कृती

  • शेवग्याचा पाला काढून तो धुवून घ्यावा .
  • नंतर तो पाला चाळणीमध्ये १०-१५ मिनिटे ठेऊन द्यावा त्यामुळे त्यातील पाणी निथळून गेल्यावर पाने बारीक चिरून घेणे. 
  • २ मोठे कांदे बारीक चिरून टाकणे आणि हिरवी मिरची चिरून टाकणे.
  • नंतर हे मिश्रण कढईत काढून मंद आचेवर गॅस वर ठेवावी 
  • कढईवर झाकण ठेवावे.
  • २-३ मिनिटांनी ती भाजी परतावी आणि चवीपुरते मीठ टाकावे.
  • भाजीतले पाणी पूर्ण सुकले कि त्यात ओलं खोबरं घालणे आणि वरून नारियल तेल थोडं टाकून भाजी परतून घ्यावी आणि झाकण ठेऊन २-३ मिनिटांनी गॅस बंद करावा.
टीप :
  • इतर पालेभाज्यांप्रमाणे ह्या भाजीतही डाळी घालता येतात.
  • शेवग्याच्या फुलांचीही भाजी करतात.
  • ही भाजी उष्ण असल्याने पावसाळ्यात किंवा हिवाळ्यातच खातात.


Wednesday, July 26, 2017

पातोळे / Steamed Patole / Patole for Nagpanchami Special Sweet Dish

Patole is a traditional Maharashtrian sweet dish. Patole are steamed rice rolls which are stuffed with mouthwatering fillings like coconut and jaggery & are made in some households on Nagpanchami. Patole are steamed in turmeric leaves which capture its aroma.


साहित्य
  • तांदळाचे पिठ
  • एक नारळ
  • खसखस
  • गूळ
  • हळदीची पाने
  • वेलचीपूड
  • तेल
  • मीठ
कृती
  • सारण बनवण्यासाठी एक अख्खा नारळ किसून घ्यावा. जितक्या वाट्या किसलेला नारळ असेल त्याचा निमपट गुळ किसून घ्यावा. पातेल्यात किसलेला नारळ, खसखस आणि गुळ मंद आचेवर ढवळत राहणे.
  •  गुळ पुर्ण वितळू देणे आणि त्यातील पाणी पूर्ण सुकले की वेलचीपूड घालावी आणि ढवळुन बाजूला ठेऊन देणे.
  • पातेल्यात २ कप पाणी उकळत ठेवावे. त्यात चवीपुरते मीठ घालावे. गॅस बारीक करून त्यात पीठ घालावे आणि ढवळावे व झाकण ठेऊन गॅस बंद करावा. ५–१० मिनिटे झाकण ठेऊन द्यावे.

  • परातीमध्ये ही उकड काढून घ्यावी आणि ती व्यवस्थित मळून घ्यावी.
  • उकड मळताना ती घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी घालून मळावी
  • हळ्दीच्या अर्ध्या पानावर लिंबाएवढा गोळा थापावा त्यात तयार सारण घालावे.
  • अर्धे पान दुमडून घ्यावे. अशी थोडीशी पाने तयार करुन घ्यावी. पातेल्यात एक तांबा पाणी घेणे त्यावर स्टीलची किंवा अॅल्युमिनियमची चाळणी ठेवावी. तयार केलेली पाने नीट लावावी व १० मिनिटे वाफवून घ्यावी. तोपर्यंत दुसरी पाने तयार करावी.
  • .वाफवलेली पाने सोडवून घ्यावी. हे पातोळे साजुक तुपाबरोबर खायला घ्यावे. 






















Tuesday, July 18, 2017

भाकरीची फ्रँकी / Bhakri Chi Frankie

भाकरीची फ्रॅंकी / Bhakri Chi Frankie



साहित्य 
  • साफ केलेले बोनलेस चिकनचे छोटे तुकडे
  • हळद
  • लाल मसाला
  • दही
  •  मीठ
  •  मध्यम रवा
  •  आलं लसूण पेस्ट 
  • तांदळाचे पीठ
  • तांदळाची भाकरी
  • बारीक चिरलेला कोबी
  • बारीक चिरलेली सिमला मिरची
  • अंड
  • सोया सॉस
  • टोमॅटो केचप
  • चाट मसाला
  • कांद्याचे गोल पातळ काप  
  • बारीक चिरलेली कोथिंबीर 
  • चवीपुरते मीठ
कृती
  • साफ केलेल्या बोनलेस चिकनमध्ये हळदलाल मसाला, आलं लसूण पेस्ट, दही आणि चवीपुरते मीठ घालून हे मिश्रण मिक्स करून एक तास ठेऊन द्यावे
  • एकातासानंतर त्या मिश्रणामध्ये मध्यम रवा आणि तांदळाचे पिठ घालून हे मिश्रण मिक्स करून घ्यावे.
  • गॅस वर कढई ठेऊन तेल ओतावे. तेल तापले की त्यात चिकनचे एक -एक पिस तळावे आणि बाजूला ठेऊन द्यावे.
  • त्यानंतर अंड्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून ते मिक्स करून घेणे. गॅस वर तवा ठेऊन त्यावर थोड तेल टाकून आम्लेट काढून घेणे . (आम्लेट फक्त एका बाजूने शिजू देणे.) 
  • भाकरीला थोड तेल लावून घेणे. नंतर तयार आम्लेट भाकरीवर ठेवणे.
  • नंतर त्यावर टोमॅटो केचप, आणि सोया सॉस लावून घेणे.
  • फ्राय केलेले थोडे चिकन त्यावर ठेवणे.
  • त्यावर बारीक चिरलेला कोबी आणि चिमला मिरची त्यात टाकणे.
  • गोल कापलेला कांद्याचे - काप त्यावर सजवणे आणि वरून चाट मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सजवणे.
  • त्यांनंतर भाकरीचा रोल बनवणे आणि  serve  करा.