शेवग्याच्या शेंगांबद्दल सर्वांनाच माहिती आहे. यामध्ये व्हिटामिन ए, बी-१, सी, कॅल्शियम व लोह याचा साठा असतो. पण शेवग्याच्या पानांमध्येही व्हिटामिन ए, बी-१, सी, फॉस्फरस, काबरेहायड्रेट, लोह व प्राथिने यांचा भरपूर साठा असतो व याची भाजी पण चवदार होते. कोकणात गोकुळाष्टमीच्या उपवासाला हि भाजी आणि आंबोळ्या करतात.
साहित्य :
साहित्य :
- शेवग्याचा पाला
- २ मोठे कांदे
- हिरव्या मिरच्या
- किसलेलं ओलं खोबरं
- नारियल तेल
- चवीपुरते मीठ
- शेवग्याचा पाला काढून तो धुवून घ्यावा .
- नंतर तो पाला चाळणीमध्ये १०-१५ मिनिटे ठेऊन द्यावा त्यामुळे त्यातील पाणी निथळून गेल्यावर पाने बारीक चिरून घेणे.
- २ मोठे कांदे बारीक चिरून टाकणे आणि हिरवी मिरची चिरून टाकणे.
- नंतर हे मिश्रण कढईत काढून मंद आचेवर गॅस वर ठेवावी
- कढईवर झाकण ठेवावे.
- २-३ मिनिटांनी ती भाजी परतावी आणि चवीपुरते मीठ टाकावे.
- भाजीतले पाणी पूर्ण सुकले कि त्यात ओलं खोबरं घालणे आणि वरून नारियल तेल थोडं टाकून भाजी परतून घ्यावी आणि झाकण ठेऊन २-३ मिनिटांनी गॅस बंद करावा.
- इतर पालेभाज्यांप्रमाणे ह्या भाजीतही डाळी घालता येतात.
- शेवग्याच्या फुलांचीही भाजी करतात.
- ही भाजी उष्ण असल्याने पावसाळ्यात किंवा हिवाळ्यातच खातात.
No comments:
Post a Comment