आंबोळी हि मालवणातील खास पाककृती आहे. काही लोक घावणे आणि आंबोली एकच समजतात पण तस नाही आहे. आमच्या मालवणात तरी घावणे आणि आंबोळ्या हे दोन वेगवेगळे पदार्थ आहेत. घावणे हे फक्त तांदळाच्या पिठाचे बनवले जातात . आणि आंबोळ्या ह्या पीठ आंबवून केले जातात . आंबोळी हि डोशाप्रमाणे पातळ व क्रिस्पी नसते तर जाडसर आणि मऊ असते. आणि आंबोळीला छान जाळी पडते.
साहित्य
कृती
टीप
साहित्य
- ४ वाटी जाडा तांदूळ
- १ वाटी उडीद डाळ
- अर्धी वाटी चना डा
- तेल
- मीठ
कृती
- प्रथम ४ वाटी जाडा तांदूळ, १ वाटी उडदाची डाळ आणि अर्धा वाटी चना डाळ स्वच्छ धुऊन ७ - ८ तास भिजत ठेवणे.
- त्यानंतर ते मिक्सरला बारीक लाऊन घेणे. त्यात चवीपुरते मीठ टाकून परत ७-८ तास ठेऊन देणे.
- त्यानंतर भिड्याला तेल पसरून लावणे नंतर त्यात मिक्स पिठ थोड घालून ते जाडसर पसरवणे आणि झाकण ठेवणे.
-
- आणि गॅस मंद ठेवणे. आंबोळीला छोटे - छोटे होल आल्यावर ती पलित्याने परतने आणि परत झाकण ठेवणे.
-
- ५ मिनिटांनी गॅस बंद करणे.
टीप
- हि आंबोली मटण रस्सा, कोंबडी रस्सा, काळे वाटाणे आमटी किंवा चना आमटी सोबत छान लागते .
- नारळाच्या चटणीसोबत सुद्धा छान लागते.
- आंबोळ्या तुम्ही non stick pan मध्ये सुद्धा करू शकतात.
No comments:
Post a Comment