Patole is a traditional Maharashtrian sweet dish. Patole are steamed rice rolls which are stuffed with mouthwatering fillings like coconut and jaggery & are made in some households on Nagpanchami. Patole are steamed in turmeric leaves which capture its aroma.
साहित्य
- तांदळाचे पिठ
- एक नारळ
- खसखस
- गूळ
- हळदीची पाने
- वेलचीपूड
- तेल
- मीठ
- सारण बनवण्यासाठी एक अख्खा नारळ किसून घ्यावा. जितक्या वाट्या किसलेला नारळ असेल त्याचा निमपट गुळ किसून घ्यावा. पातेल्यात किसलेला नारळ, खसखस आणि गुळ मंद आचेवर ढवळत राहणे.
- गुळ पुर्ण वितळू देणे आणि त्यातील पाणी पूर्ण सुकले की वेलचीपूड घालावी आणि ढवळुन बाजूला ठेऊन देणे.
- पातेल्यात २ कप पाणी उकळत ठेवावे. त्यात चवीपुरते मीठ घालावे. गॅस बारीक करून त्यात पीठ घालावे आणि ढवळावे व झाकण ठेऊन गॅस बंद करावा. ५–१० मिनिटे झाकण ठेऊन द्यावे.
- परातीमध्ये ही उकड काढून घ्यावी आणि ती व्यवस्थित मळून घ्यावी.
- उकड मळताना ती घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी घालून मळावी.
- अर्धे पान दुमडून घ्यावे. अशी थोडीशी पाने तयार करुन घ्यावी. पातेल्यात एक तांबा पाणी घेणे त्यावर स्टीलची किंवा अॅल्युमिनियमची चाळणी ठेवावी. तयार केलेली पाने नीट लावावी व १० मिनिटे वाफवून घ्यावी. तोपर्यंत दुसरी पाने तयार करावी.
- .वाफवलेली पाने सोडवून घ्यावी. हे पातोळे साजुक तुपाबरोबर खायला घ्यावे.