अळूचं फदफदं / अळूची भाजी / अळूची पातळ भाजी
अळूची भाजी ही महाराष्ट्रातील पारंपारिक पदार्थ आहे . हि भाजी पावसाच्या सीजन मध्ये भेटते. अळूमध्ये खूप चांगले गुणधर्म आहेत. A व C हे व्हिटॅमिन यामध्ये आहेत.
साहित्य :
- १०ते १५ देठासहित भाजीच्या अळूची पाने
- ३ ते ४ टेस्पून शेंगदाणे
- १ वाटी मक्याचे दाणे
- २ - ३ कोकम
- २ टेस्पून मसाला
- १/२ टेस्पून हळद
- २-३लसणीचा पाकळ्या
- किसलेले खोबरे
- हिरवी मिरची
- चवीपुरते मीठ
कृती:
- प्रेशर कुकरमध्ये शेंगदाणा मक्याचे दाणे ३ किंवा ४ शिट्ट्या करून शिजवून घ्यावे.
- अळूची पाने धुवून घ्यावी. देठं वेगळी काढावीत आणि सोलून घ्यावीत. नंतर पानं बारीक चिरून घ्यावी. देठंही चिरून घ्यावीत.
- अळूची चिरलेली पाने शिजवून घ्यावीत आणि नंतर त्यात शेंगदाणा आणि मक्याचे दाणे टाकावेत.
- कढईत तेल टाकून लसणीचा पाकळ्या टाकून परतून घ्यावे. मसाला आणि हळद घालावे
- नंतर त्यात शिजवलेलं अळू आणि प्रेशर कुकर मधून शिजवलेले मक्याचे दाणे आणि शेंगदाणा त्यात टाकावा.
- किसलेल खोबरे व हिरवी मिरचीचे बारीक वाटप करुन ते त्यामध्ये घालावे
- कोकम त्यात टाकणे आणि चवीपुरतं मीठ घालावे.
- गरजेनुसार थोडे पाणी घालावे. (भाजी पळीवाढी करावी, प्रचंड घट्टही नको आणि पातळही नको.) उकळी काढावी. गरमागरम भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करावे.
टीप:
- भाजीला मसाले आणि आंबटपणा थोडा पुढे असल्यास भाजी लज्जतदार लागते.
- अळू चिरताना हाताला खाज आल्यास हाताला कोकम कुस्करून लावावे त्याने हाताला खाज यायची बंद होते.
- या भाजीत फणसाच्या आठ्या किव्हा मक्याचं कणीस उकडून घालू शकता.
- कच्या खोबऱ्याचा वाटपाऐवजी भाजलेल्या कांदा खोबऱ्याचे वाटप घालू शकता.
No comments:
Post a Comment