Tuesday, July 11, 2017

उकडीचे मोदक  / Ukadiche Modak / Steamed Modak 

उकडीचे मोदक  / Ukadiche Modak / Steamed Modak 

Ukadiche modak is a sweet dumpling very much popular in Maharashtra and south India. Modak can be fried or steamed. Ukadiche Modak is a marathi word which means "Steamed modak". The filling is made of fresh coconut and jaggery, the cover is made of Rice flour.

Modak has a special importance in the worship of the Hindu elephant god, Ganesh. Modak is believed to be his favorite food and Ganesh worship ceremony pooja concludes with offering of 21 modaks to the deity.




साहित्य
  • तांदळाचे पिठ
  • एक नारळ
  • खसखस
  • गूळ
  • हळदीची ४ - ५ पाने
  • वेलचीपूड
  • तेल
  • मीठ
कृती
  • सारण बनवण्यासाठी एक अख्खा नारळ किसून घ्यावा. जितक्या वाट्या किसलेला नारळ असेल त्याचा निमपट गुळ किसून घ्यावा. पातेल्यात किसलेला नारळ, खसखस आणि गुळ मंद आचेवर ढवळत राहणे.
  •  गुळ पुर्ण वितळू देणे आणि त्यातील पाणी पूर्ण सुकले की वेलचीपूड घालावी आणि ढवळुन बाजूला ठेऊन देणे.
  • पातेल्यात २ कप पाणी उकळत ठेवावे. त्यात चवीपुरते मीठ घालावे. गॅस बारीक करून त्यात पीठ घालावे आणि ढवळावे व झाकण ठेऊन गॅस बंद करावा. ५–१० मिनिटे झाकण ठेऊन द्यावे.

  • परातीमध्ये ही उकड काढून घ्यावी आणि ती व्यवस्थित मळून घ्यावी.
  • उकड मळताना ती घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी घालून मळावी
  • उकड व्यवस्थित मळून झाली कि सुपारीपेक्षा थोडे मोठे गोळे तयार करून त्याची पारी तयार करावी.
  • त्यात एका चमचाभर सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात. 

  • आणि सर्व चुण्या एकत्र करून मोदक बंद करावा. 
  • पातेल्यात एक तांबा पाणी घेणे त्यावर स्टीलची किंवा अॅल्युमिनियमची चाळणी ठेवावी. त्यावर हळदीची पाने लावावी नंतर त्यात मोदक ठेवणे. मोदक एकावर एक ठेऊ नये. त्यामुळे मोदक फुटण्याची शक्यता असते. मोदक जेवढे मावतील तेवढेच ठेवावेत. मोदकांवर हळदीची पाने ठेवावीत आणि त्यावर झाकण (ताट किंवा तवा) ठेवावा. गॅस लावून १२-१५ मिनिटे वाफ काढावी.
टीप 
  • मोदक हळदीच्या पानात वाफवल्यास स्वाद चांगला येतो.
  • हळदीची पाने उपलब्ध नसल्यास केळीची पाने किंवा स्वच्छ धुतलेला सूती कापड तुम्ही ठेऊ शकता. 
  • उकडीचा गोळा बनवताना हाताला थोडे तेल लावून माळवी त्यामुळे तुमच्या हाताला पीठ चिकटणार नाही.
  • तांदळाच्या पिठाची उकड करण्यासाठी जितक्या वाट्या पीठ घ्याल तेवढ्या वाट्या पाणी घ्यावे. 


Sunday, July 9, 2017

चिकन पकोडा / Crispy Fried Chicken


चिकन पकोडा / Crispy Fried Chicken 



साहित्य
  • साफ केलेले बोनलेस चिकनचे छोटे तुकडे
  • हळद
  • मसाला
  • दही
  •  मीठ
  •  मध्यम रवा
  •  आलं लसूण पेस्ट 
  • तांदळाचे पीठ

कृती
  • साफ केलेल्या बोनलेस चिकनमध्ये हळद, मसाला, आलं लसूण पेस्ट, दही आणि चवीपुरते मीठ घालून हे मिश्रण मिक्स करून एक तास ठेऊन द्यावे. 
  • एकातासानंतर त्या मिश्रणामध्ये मध्यम रवा आणि तांदळाचे पिठ घालून हे मिश्रण मिक्स करून घ्यावे. 
  • गॅस वर कढई ठेऊन तेल ओतावे. तेल तापले की त्यात ते चिकनचे एक -एक पिस टाकून तळावे.
  • नंतर serve करा. 
  • हे चिकन नुसते खाण्यास अतिशय उत्तम लागते.



    Friday, July 7, 2017

    अळूचं फदफदं / अळूची भाजी / अळूची पातळ भाजी 

    अळूचं फदफदं / अळूची भाजी / अळूची पातळ भाजी 


    अळूची भाजी ही महाराष्ट्रातील पारंपारिक पदार्थ आहे . हि भाजी पावसाच्या सीजन मध्ये भेटते. अळूमध्ये खूप चांगले गुणधर्म आहेत. A व  C हे व्हिटॅमिन यामध्ये आहेत.



    साहित्य : 
    • १०ते १५ देठासहित भाजीच्या अळूची पाने 
    • ३ ते ४ टेस्पून शेंगदाणे
    •  १  वाटी मक्याचे दाणे 
    • २ - ३ कोकम 
    • २ टेस्पून मसाला
    • १/२ टेस्पून हळद
    • २-३लसणीचा पाकळ्या 
    • किसलेले खोबरे
    • हिरवी मिरची
    • चवीपुरते मीठ 
    कृती: 
    1.  प्रेशर कुकरमध्ये शेंगदाणा मक्याचे दाणे ३ किंवा ४ शिट्ट्या करून शिजवून घ्यावे. 
    2.  अळूची पाने धुवून घ्यावी. देठं वेगळी काढावीत आणि सोलून घ्यावीत. नंतर पानं बारीक चिरून घ्यावी.  देठंही चिरून घ्यावीत. 
    3. अळूची चिरलेली पाने शिजवून घ्यावीत आणि नंतर त्यात शेंगदाणा आणि मक्याचे दाणे टाकावेत.
    4. कढईत तेल टाकून लसणीचा पाकळ्या टाकून परतून घ्यावे. मसाला आणि हळद घालावे 
    5. नंतर त्यात शिजवलेलं अळू आणि प्रेशर कुकर मधून शिजवलेले मक्याचे दाणे आणि शेंगदाणा त्यात टाकावा.
    6. किसलेल खोबरे व हिरवी मिरचीचे बारीक वाटप करुन ते त्यामध्ये घालावे
    7. कोकम त्यात टाकणे आणि चवीपुरतं मीठ घालावे.
    8. गरजेनुसार थोडे पाणी घालावे. (भाजी पळीवाढी करावी, प्रचंड घट्टही नको आणि पातळही नको.) उकळी काढावी. गरमागरम भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करावे. 

    टीप:
    • भाजीला मसाले आणि आंबटपणा थोडा पुढे असल्यास भाजी लज्जतदार लागते.
    • अळू चिरताना हाताला खाज आल्यास हाताला कोकम कुस्करून लावावे त्याने हाताला खाज यायची बंद होते. 
    • या भाजीत फणसाच्या आठ्या किव्हा  मक्याचं कणीस उकडून घालू शकता.
    • कच्या खोबऱ्याचा वाटपाऐवजी भाजलेल्या कांदा खोबऱ्याचे वाटप घालू शकता.

      

    Wednesday, July 5, 2017

    लाल मिरचीची चटणी

    लाल मिरचीची चटणी




    साहित्य
    ओल्या नारळाचे किसलेले खोबरे, ४_५ लाल बेडग्या मिरच्या, लसुण आणि चवीपुरते मीठ.

    कृती
    1. ४-५ लाल बेडग्या मिरच्या अर्धा तास पाण्यात भिजत ठेवणे.
    2. ओल्या नारळाचे किसलेले खोबरं, भिजत ठेवलेल्या लाल बेडग्या मिरच्या, लसुण  आणि त्यात चवीपुरते मीठ घालावे.
    3. हे सगळं मिक्सरला बारीक लावणे.
    4. नंतर serve करा.
    टीप
    • या चटणीत चिंच किव्हा कैरी घालू शकता. 
    • हि चटणी भाकरी सोबत किव्हा आंबोळ्यांसोबत खाऊ शकता. 


    Thursday, June 22, 2017

    सोलकढी / कोकम कढी

    सोलकढी / कोकम कढी


    साहित्य :  
    ताज्या नारळाचं दुध २ कप 
    ४-५ सोलं (आमसुलं/ कोकम )
    १ हिरवी मिरची
    १ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून
    १-२  लसूण पाकळ्या  (Optional )
    १ जिरं
    १ १/२ टीस्पून साखर
    मीठ चवीप्रमाणे 

    कृती :
    • १ कप ताज्या खोब-याचे तुकडे, जिरं, हिरवी मिरची, (ज्यांना लसूण आवडत असल्यास त्यात लसूणच्या पाकळ्या टाकाव्या) आणि १ कप पाणी मिक्सर किंवा ब्लेंडर मध्ये घालून त्याची प्युरी करा. सुती कपड्यातून हि प्युरी गाळुन घ्या आणि घट्ट पिळून नारळाचं दुध काढा. तोच चोथा पुन्हा थोड्या पाण्यात घालून याच पद्धतीने दुध काढा. साधारण एका नारळातून २ १/२ कप दुध निघतं. उरलेला चोथा फेकून द्या. रेडीमेड कोकोनट मिल्क वापरणार असाल तर १ कप कोकोनट मिल्क घ्या आणि त्यात १ कप पाणी घालून पातळ करून घ्या.
    • पाण्यात सोलं ३०-३५ मिनिटे भिजत घाला म्हणजे कोकमाचा अर्क पाण्यात उतरेल. अर्ध्या तासाने कोकमाचं पाणी नारळाच्या दुधात घालून कोकम बाजूला काढून ठेवा.
    • नंतर साखर मीठ घालून ढवळून घ्या. वरून कोथिंबीर बारीक चिरून घाला आणि तयार कढी फ्रीज मध्ये ठेवून थंडगार serve करा.


    टीप:
    हि कढी पाचक असून नुसती प्यायला किंवा भातावर घ्यायला छान लागते. कोकणात मासे किंवा चिकन-मटणचा बेत असेल तर हमखास सोलकढी करतात.