Monday, September 27, 2021

मोड आलेल्या मेथीदाण्यांची भाजी - Fenugreek Seed Sprouts

मोड आलेल्या मेथीदाण्यांची भाजी - Fenugreek Seed Sprouts

औषधी गुणांनी परिपूर्ण अशी मेथीची भाजी आहे. मेथी दाणे आणि मोड आलेल्या मेथ्यांमध्ये प्रथिनं, फायबर, ‘क’ जीवनसत्त्व आणि मोठय़ा प्रमाणात लोह आढळतं. कोलेस्टॉॅलची पातळी कमी करण्यासाठी, हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी मेथीचा उपयोग केला जातो. मेथीची पानं चवीला कडवट असली तरी स्वादिष्ट असतात, पचनालाही उपयुक्त असतात. मोड आलेल्या मेथ्या तेलात वाटून केसाला लावल्याने केसांचं आरोग्य सुधारतं. मेथी ही भाजी पाने व बिया (मेथीदाणे) या दोन्ही रूपांत वापरली जाते. मेथीच्या पानांप्रमाणेच मोड आलेल्या मेथीदाण्यांची भाजी चविष्ट लागते. 

साहित्य 

  • १ टॉमेटो बारीक कापलेला
  • हिंग
  • मोहरी 
  • जीरे 
  • कडीपत्ता
  • हळद
  • मसाला पूड
  • मीठ चवीसाठी 
  • कोथिंबीर
  • खवलेले खोबरे

कृती

  • मेथी स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी पाणी काढून एका जाळीच्या भांड्यात मोड येण्यासाठी झाकून ठेवा. मेथीदाण्यांना मोड यायला दोन दिवस लागतात. रात्री पुन्हा मेथी धुवून परत झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी मोड आलेले मेथीदाणे भाजी करण्यासाठी तयार आहेत.



  • एका टोपात थोडं पाणी गरम करत ठेवणे त्यात चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा मीठ घालणे.  पाणी तापल्यानंतर त्यात मोड आलेले मेथीचे दाणे टाकणे आणि १५ मिनिट शिजू देणे. 






  • त्यांनतर एका जाळीच्या भांड्यात ते ओतून घेणे मेथी मधील कडवट पाणी पूर्ण निघून गेल्यावर (त्यामुळे मेथीची भाजी कडू लागत नाही ) 

  •  एका कढईत तेल तापल्यावर त्यात मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी द्या. नंतर जीरे आणि हिंग घालून बारीक चिरलेला कांदा घाला.





  • कांदा थोडा गुलाबी रंगाचा झाल्यावर बारीक चिरलेला टॉमेटो टाका.






  • टॉमेटो शिजल्यावर  हळद, मसाला आणि मीठ टाकून त्यात मोड आलेले मेथीचे दाणे टाकून भाजी परतून झाकून ठेवा.  











  • ५ मिनिटांनी एकदा झाकण काढून भाजी परतून घेऊन भाजी मधील पाणी सुकले असल्यास गॅस बंद करणे.
  • वरून चिरलेली कोथिंबीर आणि खोबरे टाका.



No comments:

Post a Comment