तिळाचे लाडू / तिळगुळाचे लाडू / Sesame Laddoo
Sesame Laddoo is an Indian Sweet or Dessert that is often prepared to celebrate festivals or household events such as weddings. It is especially made during the Festival of Makar Sankranti, which falls on January 14th every year!
साहित्य
- पांढरे तीळ
- किसलेले सुखं खोबरं
- वेलची
- जायफळ
- चिकीचे गूळ
- शेंगदाणा
- चना डाळ
कृती
- पांढरे तीळ, किसलेले सुखं खोबरं आणि शेंगदाणा मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेणे.
- शेंगदाणे थंड झाल्यावर त्याची सालं काढून त्याचे तुकडे करणे.
- जायफळ आणि वेलची सुद्धा थोडी गरम करून त्याची बारीक पूड करणे.
- त्यानंतर मंद आचेवर टोप ठेऊन त्यात चिकीचे गूळ घालून ते वितळवून त्याचा व्यवस्थित पाक बनवावा.
- त्यानंतर त्यात भाजलेले पांढरे तीळ, भाजलेले सुख खोबरं, बारीक केलेले शेंगदाणे, चना डाळ, जायफळ आणि वेलचीची पूड टाकणे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणे.
- त्यानंतर टोप खाली उतरून मिश्रण गरम गरम असतानाच त्याचे छोटे छोटे लाडू बनवणे.
टीप
- गुळाचा पाक बनवताना एका वाटीत गार पाणी घ्यावे. त्यात एक थेंब पाक घालावा. बोटाने तो पाक हातात घेऊन त्याची गोळी करावी आणि वाटीतल्या पाण्यात तो गोळा खडा मारल्यासारखा टाकावा. जर वाटीचा "टण्णं" असा आवाज आला तर पाक तयार आहे असे समजावे.
- तिळाच्या लाडवाचे मिश्रण गरम असतानाच त्याचे लाडू बनवावेत. मिश्रण थंड झाल्यास त्याचे लाडू वळता येत नाहीत
- लाडू बनवताना हाताला चटका बसत असल्यास हाताला थोडे पाणी लावावे.
No comments:
Post a Comment