Thursday, March 26, 2020

भरली मिरची - Bharali Mirchi

भरली मिरची - Bharali Mirchi


साहित्य 

  • लांबट हिरव्या मिरच्या (या मिरच्या कमी तिखट असतात आणि त्यांची साल जाडसर असते. पण चवीला खुप छान लागतात.)
  • सूख खोबर
  • शेंगदाना
  • लाल तिखट
  • धणेपूड 
  • हळद 
  • तेल 
  • मीठ

कृती

  • मिरच्या धुवून पुसून घ्याव्यात. त्यांना उभी चिर द्यावी (जेणेकरून त्यात मसाला भरता येईल.) मिरच्यांमधील बिया काढून टाकून मिरच्यांना मीठ लाउन ठेवणे.
  • सुख खोबर बारीक किसून मंद आचेवर थोडे भाजून घेणे.
  • शेंगदाना मंद आचेवर भाजून घेणे. थंड झल्यावर त्याची सालं काढून घेणे.
  • मिक्सर मध्ये भाजलेले सुखे खोबरे, शेंगदाना, लाल तिखट हळद , धणेपूड आणि चवीपुरते मीठ घालून बारीक करून घेणे.
  • हा मसाला मिरच्यांमधे भरावा.
  • मध्यम आचेवर कढई  ठेऊन त्यात थोडं तेल घालून त्यात ह्या भरलेल्या मिरच्या ठेवाव्यात वरून झाकण लावून वाफ काढावी. २-४ मिनीटांनी मिरचीची बाजू पलटावी.  उरलेला मसाला त्यात टाकावा आणि आवशक्यता  वाटल्यास थोडं तेल टाका आणि झाकण लावून वाफ काढावी.








Wednesday, March 25, 2020

साधी सोपी खमंग तिळ पोळी !!

साधी सोपी खमंग तिळ पोळी !!!

तिळ आणि गुळाचा वापर करून विविध पदार्थ तयार करण्यासाठी महिला प्रयत्न करतात. त्यापैकी एक म्हणजे तीळ गुळाची पोळी. अनेकांचा घरी बनवला जाणारा हा पदार्थ खाण्यासाठी मस्त आहे झटपट होणारा आहे. तुम्ही देखी करू शकता ही तिळ गुळाची पोळी.


साहित्य

  1. पांढरे तिळ
  2. किसलेले सुखं खोबरं
  3. वेलची पूड
  4. जायफळ पूड
  5. बारीक केलेलं गुळ गूळ
  6. शेंगदाणा
  7. मैदा किंवा गव्हाचे पीठ 
  8. चवीपुरते मीठ 

कृती 



  • पांढरे तिळ, शेंगदाणा आणि किसलेलं सुख खोबर व्यवस्थित भाजून घेणे. 

  • नंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणे. 



  • नंतर मंद आचेवर कढई ठेऊन त्यात बारीक केलेलं गुळ टाकून तो व्यवस्थित वितळून घेणे.
  • त्यात १ चमचा तूप टाकून त्यात मिक्सर मध्ये बारीक केलेलं मिश्रण घालून वेलची आणि जायफळ पूड टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणे. गॅस बंद करून मिश्रण थंड करत ठेवणे. थंड झालेले तिळाचे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेणे. 
  • एका भांडयात थोडे पाणी घेऊन चवीपुरते थोडे मीठ घालून घालून त्यात मावेल एवढे गव्हाचे किंवा मैद्याचे  पीठ घालून व्यवस्थित मळून घेणे . (पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट मळू नये) . 
  • मळलेल्या पिठाचा छोटासा गोळा घेऊन तो खोलगट करणे . त्यात तिळाचे मिश्रण थोडे घालून गोळा व्यवस्थित बंद करून घेणे. त्यानंतर दोन्ही हातांनी गोळ्याला दाब देऊन तो गोळा थोडासा चपटा  करून घेणे. नंतर गोळ्याला दोन्ही बाजून सुखे पीठ लावून घेऊन पोळपाटावर गोल आकारात लाटणे. 
नंतर तव्यावर दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून नंतर तूप लावणे