Thursday, January 31, 2019

अळूवडी / Aluvadi

अळूवडी / Aluvadi

श्रावण महिना म्हटलं की अळूवडी पानात नाही असे कोकणातील घर विरळाच. गणपतीतही गौरीच्या नेवैद्यात अळूवडीला विषेश स्थान आहे.


अळूची पाने दोन प्रकारची असतात. ज्या पानांचे दांडे आणि देठ काळपट रंगाचे असतात ती पाने अळुवडीसाठी वापरतात. तुम्ही बाजारातून घेताना नीट बघून घ्या. भाजीचं अळू आणि वडीचं अळू अशी साधारण वर्गवारी भाजीवाले करतात.

अळूच्या पानांचा महिन्यातून दोनदा ते तीनदा आपल्या आहारात जरूर समावेश करावा. खूप तंतुमय पदार्थ असल्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी किंवा मधुमेही लोकांसाठी अळू अतिशय उपयुक्त आहे. A, B6 आणि C जीवनसत्वे यामध्ये खूप प्रमाणात असतात.

साहित्य 
  • ५-६ मोठी अळूची पाने 
  • तेल तळण्यासाठी 
  • चण्याच्या डाळीचे पीठ (बेसन) 
  • आगळ 
  •  लाल तिखट 
  •  हळद
  • सफेद तिळ
  • गरम मसाला 
  •  मीठ

कृती

  • एका भांड्यात बेसन घेणे, त्यात थोडी हळद, लाल तिखट , थोडे सफेद तिळ, थोडा गरम मसाला आणि चवीपुरते मीठ आणि थोडा आगळ घालून मिश्रण एकजीव करून घेणे. आवशक्यता वाटल्यास पाणी घालणे. मिश्रण थोडं घट्ट करून घेणे.
  • आता अळूची सगळी पाने देठ कापून स्वच्छ धुवून, पुसून घ्यावीत.
  • पाने उलटी करून जर काही जाड्या शिरा असतील  तर कापून घ्याव्यात.
  • सगळ्यात मोठे पान उलटे ठेवून  त्यावर बेसन पेस्ट पसरवून घ्यावी.
  • आता दुसरे पान त्यावर उलटे ठेवून त्यावरही पेस्ट लावून घ्यावी.
  • अशा तऱ्हेने सगळी पाने एकावर एक लावून सगळ्यांना पेस्ट लावावी.
  • ह्या सगळ्या पानांची घट्ट गुंडाळी करावी.
  • आता ही गुंडाळी मोदकपात्रात १२-१३ मिनटे उकडून घ्यावी.
  • उकडल्यावर हा उंडा थंड करून घ्यावा.
  • थंड झाल्यावर ह्याच्या एकसमान आकाराच्या वड्या कापाव्यात.
  • ह्या वड्या गरम तेलात खरपूस तळून घ्याव्यात. 







No comments:

Post a Comment