कैरीचे सार / कैरीची आमटी /Raw Mango Curry
कैऱ्यांचा मोसम चालू होत आहे. कैरीला तिखट, मीठ लावून खाताना कसे वाटते? मस्त ना ! मग आता कैरीची हि आंबट-गोड आमटी एकदा करून बघा. नाव एकताच तोंडाला पाणी सुटेल अशी कैरीच्या आमटीची कृती खाली देत आहे. नक्की करून बघा.
साहित्य
- एक कैरी
- किसलेलं ओलं खोबरं
- ५-६ लसूण पाकळ्या
- हिरव्या मिरच्या
- मोहरी
- कढीपत्ता
- ५-७ काजू
- कोथिंबीर
कृती
- कैरीची वरची साल काढून कैरीचे मोठे मोठे तुकडे करणे.
- किसलेलं ओल्या नारळाचं खोबरं, हिरव्या मिरच्या, २-३ लसूण, ५-७ काजू, कोथिंबीर आणि कैरीच्या फोडी हे सर्व एकत्र मिक्सरमधून बारीक वाटून घेणे.
- गॅस वर टोप ठेऊन त्यात तेल ओतणे. तेल गरम झाले कि मग त्यात मोहरी आणि कढीपत्ता टाकणे. मोहरी तडतडली कि मग लसूण टाकणे त्याला थोडा गुलाबी रंग आला कि मग त्यात मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण टाकून त्यात आवश्यकतेप्रमाणे मीठ आणि पाणी घालणे आणि ढवळत राहणे.
- साराला उकळी आली कि मग गॅस बंद करावा.



No comments:
Post a Comment