Thursday, June 22, 2017

सोलकढी / कोकम कढी

सोलकढी / कोकम कढी


साहित्य :  
ताज्या नारळाचं दुध २ कप 
४-५ सोलं (आमसुलं/ कोकम )
१ हिरवी मिरची
१ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून
१-२  लसूण पाकळ्या  (Optional )
१ जिरं
१ १/२ टीस्पून साखर
मीठ चवीप्रमाणे 

कृती :
  • १ कप ताज्या खोब-याचे तुकडे, जिरं, हिरवी मिरची, (ज्यांना लसूण आवडत असल्यास त्यात लसूणच्या पाकळ्या टाकाव्या) आणि १ कप पाणी मिक्सर किंवा ब्लेंडर मध्ये घालून त्याची प्युरी करा. सुती कपड्यातून हि प्युरी गाळुन घ्या आणि घट्ट पिळून नारळाचं दुध काढा. तोच चोथा पुन्हा थोड्या पाण्यात घालून याच पद्धतीने दुध काढा. साधारण एका नारळातून २ १/२ कप दुध निघतं. उरलेला चोथा फेकून द्या. रेडीमेड कोकोनट मिल्क वापरणार असाल तर १ कप कोकोनट मिल्क घ्या आणि त्यात १ कप पाणी घालून पातळ करून घ्या.
  • पाण्यात सोलं ३०-३५ मिनिटे भिजत घाला म्हणजे कोकमाचा अर्क पाण्यात उतरेल. अर्ध्या तासाने कोकमाचं पाणी नारळाच्या दुधात घालून कोकम बाजूला काढून ठेवा.
  • नंतर साखर मीठ घालून ढवळून घ्या. वरून कोथिंबीर बारीक चिरून घाला आणि तयार कढी फ्रीज मध्ये ठेवून थंडगार serve करा.


टीप:
हि कढी पाचक असून नुसती प्यायला किंवा भातावर घ्यायला छान लागते. कोकणात मासे किंवा चिकन-मटणचा बेत असेल तर हमखास सोलकढी करतात.